ओला दुष्काळ, त्यात मराठा आरक्षण नाही; तरुणाची आत्महत्या
जालना,
ओलादुष्काळ आणी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी ही लागत नाही या सर्व परिस्थितीलाा कंटाळून येणोरा ता. परतूर येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. सदाशिव शिवाजी भुंबर वय २२ असे आत्महत्याा केलेल्य तरुणाचे नाव आहे.
सदाशिव हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने इलेक्ट्रिशियन चा कोर्स केलेला आहे मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला पाहिजे तशी नोकरी मिळत नव्हती . वीस पंचवीस दिवसांपूर्वी तो गावाकडे येनोरा येथे आला होता. त्याला चार एकर शेती आहे ,मात्र गावाकडे ही सतत पाऊस , ओला दुष्काळ असल्याने शेतातील पिके ही हातची गेली आहेत. आता पुढे कसं व्हायचं ?याच विवंचनेत त्याने मंगळवारी घरच्या छताच्या अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .तशी चिठ्ठी ही त्याने लिहून ठेवली असल्याचे त्याचे चुलते अंकुश भुम्बर यांनी सांगितले.
या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु ची नोंद घेण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .अधिक तपास पोलीस करीत असून पंचनाम्यात सर्व बाबी समजतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
edtv news jalna-9422219172