Talukaजालना जिल्हा

शेत वस्तीवरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ;बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बदनापूर-घरासमोर कोंबड्यांना दाने टाकीत असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. हि घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बदनापुर तालुक्यातील देवगाव शिवारातील शेतवस्तीवर घडली. या संतापजनक घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवगांव शेतवस्तीवर एक कुटुंब वास्तव्यास आहे. १४ सप्टेंबर रोजी कुटुंबातील सदस्य कामा निमित्त बाहेर होते घरात १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून अन्वर खॉ कादर खॉ पठाण, रा. देवगांव, ता. बदनापुर हा तिच्याकडे  शेतवस्तीवर आला व सदर मुलगी कोंबड्यांना दाने टाकीत असतांना तिचे केस धरुन तिला घरात फरफडत नेले व त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत सदर पिडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन बदनापुर पोलीस ठाण्यात अन्वर खॉ कादर खॉ पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोनि बंटेवाड करीत आहे.

edtv news badapur

 

Related Articles