Advertisment
जालना जिल्हाराज्य

….तो नराधम 60 वर्षाचा; पहाटे तीन वाजता पोलिसांनी घेतला ताब्यात

जालना- शेत वस्तीत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तो नराधम सुमारे 60 वर्षे वयाचा आहे. त्याने केलेल्या या कुकर्माचा गुन्हा बदनापूर पोलिस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर हा नराधम फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापुर पोलिसांनी आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे .

शेत वस्तीत राहणाऱ्या एका कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्या परिवारातील बारा वर्षाची मुलगी घरासमोर असलेल्या कोंबड्यांना दाणे टाकत होती, हे टाकत असतानाच मंगळवारी दुपारी अन्वरखान कादरखान पठाण राहणार देवगाव, तालुका बदनापुर जिल्हा जालना, याची वाईट नजर तिच्यावर पडली आणि त्याने डाव साधला. त्यानंतर त्या मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर मुलीच्या आईने बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली .ही तक्रार देत असतानाच या नराधमाला गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळाली आणि तो पसार झाला .एकट्या बदनापूर पोलिसांना या नराधमाला शोधणे कठीण गेले असते म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील या नराधमाच्या शोधात रात्री नऊ वाजल्यापासून लागले ,आणि माहिती घेत- घेत भोकरदन तालुका पिंजून काढला.  आज सकाळी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावातून या नराधमाला ताब्यात घेतले आहे. सुमारे 60 वर्षे वयाचा हा नराधम आहे आणि आपल्या मुलीच्या नव्हे तर नातीच्या वयाच्या असलेल्या मुलीवर त्याने हा अत्याचार केला असल्यामुळे बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोकुळसिंग कायटे, किशोर पुंगळे ,सहाने, यांच्यासह बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बंटेवाड आणि त्यांच्या टीमने या नराधमाला शोधण्यात यश मिळविले आहे.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button