वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे मूर्तीवेसची दुरुस्ती रखडली
जालना – शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली मूर्ती वेस दिनांक 31 जुलै रोजी पडली होती .मध्यरात्री एक ट्रक या वेसमधून जाण्याचा प्रयत्न करत असताना या वेसेचा काही भाग ढासळला आणि ती धोकादायक बनली.
त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेने हा रस्ता बंद केला. खरे तर जालना शहरातून कादराबाद, पाणीवेस मार्गे शिवाजीपुतळा भागात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. या परिसरामध्ये हॉटेल्स, दवाखाने, बँक ,शाळा, ही सर्व महत्त्वाची ठिकाणे आहेत, आणि या भागात जाण्यासाठी कर्मचारी नागरिकांची मोठी गर्दी असते. मात्र अद्याप पर्यंत ही वेस दुरुस्त न झाल्याने जालना वासियांची मोठी कुचंबना होत आहे. या वाहतुकीचा परिणाम सराफा आणि अलंकार टॉकीज या गर्दीच्या ठिकाणांवर झाला आहे त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी होत आहे. या वेसेची मालकी वक्फ बोर्डाकडे आहे आणि हद्द जालना नगरपालिकेची आहे .अशा तांत्रिक अडचणी या वेसेची दुरुस्ती रखडली आहे. जालना नगरपालिकेने वकप बोर्डाकडे ही वेस दुरुस्त करायची किंवा पाडायची या दोन्हीसाठी ही संमती मागितले आहे, मात्र दीड महिन्यांपासून याचे काहीच उत्तर न आल्यामुळे हा निर्णय थांबलेला असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.
दरम्यान चार दिवसावर गणेश विसर्जन आले आहे. मात्र हा महत्त्वाचा रस्ता अद्यापही रहदारीसाठी सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान वक्फ बोर्डाकडून कोणताही निर्णय आला तर एका दिवसात या मूर्तीवेेसची दुरुस्ती करायची किंवा तिला भुईसपाट करून रस्ता करायचा हे काम नगरपालिका करू शकते. असा विश्वासही मुख्याधिकार्यनी व्यक्त केला.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,,9422219172