जालना जिल्हा

..तिने प्रियकरासाठी केला सहा वर्षाच्या मुलाचा खून

जालना- प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा मुलाचा खूनकेल्याची दुर्दैवी घटना आंबड येथे घडली.
प्रियकराच्या मदतीने या महिलेने मुलाच्या तोंडात बोळे कोम्बुन जीव घेतला आणि मुलगा हरवल्याचा बनाव केला. या संतापजनक प्रकारामुळे जालना जिल्हा पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. परवा बदनापूर तालुक्यात 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला होता. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान अंबड पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी ला ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील वडगाव येथील 21 वर्षीय विवाहित महिला तिच्या भावाच्या उपचारासाठी आंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगाआदित्य देखील होता. भावाला दवाखान्यात भरती केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने ही महिला दवाखान्याच्या बाहेर पडली, परंतु सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचा बहाना करून तिने तिथे असलेल्या प्रियकराच्या हवाली केले. आणि हा प्रियकर अनोळखी असल्याचाही बनाव केला. हो-नाही करत करत  जगधने 22, राहणार पैठण याने माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नंबर घेऊन जा असे म्हणत या महिलेला एक मोबाईल नंबर दिला. थोड्याच वेळात ती महिला औषध घेऊन आली तोपर्यंत हे दोघेही गायब झाले होते. त्यानंतर मुलगा हरवल्याचा बनाव करून या महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि बुधवारी संध्याकाळी आदित्य उघडे चा मृतदेह घनसांगी रस्त्यावरील एका नाल्याच्या बाजूला असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. दरम्यान महिलेजवळ तरुणाने दिलेल्या नंबरच्या आधारे पोलिसांनी हा तपास पूर्ण केला आहे.  जगधने याच्यासाठी या विवाहित प्रेयसीने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा जीव घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये कलम 302 अन्वये खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button