पे फोनद्वारे गंडा घालणाऱ्या जालन्याच्या भामट्याला मुद्देमालासह अटक

जालना-हरवलेल्या सिम कार्ड चा वापर करून पे फोन द्वारे नागरिकाला 3 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्य जालन्यातील भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख 33 हजार रुपये हस्तगत केले आहेत.
युपी मधील बिजनोर येथे राहणारे मनदीप सिंग राजवीर सिंग हे दिनांक 5 ऑगस्ट रोजी जालना येथील श्री गुरु गणेश मुथा हॉस्पिटल मध्ये दुरुस्तीच्या कामानिमित्त आले होते. दरम्यान शहरात प्रवास प्रवास करीत असताना त्यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हरवला. या मोबाईल मध्ये असलेल्या सिम कार्ड पे फोन ॲप च्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीने तीन लाख 34 हजार490 रुपयांची उलाढाल केली. याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला. या विभागाने या प्रकरणाचा तपास लावला. मोबाईल मधील पे फोनच्या माध्यमातून जालना शहरातील संभाजीनगर भागात असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत राहणाऱ्या केतन शाम नवलखा याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आणि त्यानुसार पोलिसांनी दिनांक 8 सप्टेंबरला केतन नवलखा ला अटक केली. आणि त्याच्याकडून या प्रकरणाचे धागेदोरे उकलुन घेतले आणि त्यावरून केतनने महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव तर मध्यप्रदेश मधील इंदोर, खंडवा ,बुऱ्हाणपूर, खरगोन, या ठिकाणी ही रक्कम पाठविली होती. पोलिसांनी संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचून हडप केलेल्या तीन लाख 34 हजार 490 रुपयांपैकी एक लाख 33 हजार 80 रुपये परत मिळविण्यात यश आले मिळविले आहे . सायबर शाखेचे प्रभारी गुणाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक दराडे, शिवाजी देशमुख, सुधीर गायकवाड,अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, रईस शेख, यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी संगीता चव्हाण ,रेखा घुगे ,आदींनी हा तपास लावण्यासाठी प्रयत्न केले.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172