राज्य

वंदनिय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराला मुहूर्त मिळेना

जालना-आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याकडे आली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर ठाकरे घराण्याच्या नावाने विविध पुरस्कार आणि विविध संस्थांना नाव देणे सुरू झाले. त्यातीलच एक पुरस्कार म्हणजे “वंदनिय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार “. गेल्या 2 वर्षांपासून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले मात्र अद्याप पर्यंत निकालच जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे कोरोना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुढील महिनाभरात हे पुरस्कार वितरित होतील, असे आश्वासन आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने दिले आहे.

आरोग्य विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या विभागाशी निगडित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हे प्रस्ताव मागविण्यात आले होते. आरोग्य उपसंचालकांकडून पुणे येथील माहिती शिक्षण व संवाद(iec) विभागाचे संचालक डॉ. कैलास बाविस्कर यांच्याकडे हे प्रस्ताव गेले देखील आहेत मात्र अद्याप पर्यंत या पुरस्काराच्या शिलेदारांचे नाव शासनाने जाहीर केले नाही,पुरस्कार वितरण तर लांबचा विषय. या विभागातील कर्मचाऱ्यां सोबतच प्रसिद्धी माध्यमातील व्यक्तींना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मानाचा आणि आर्थिक बाजूने सक्षम असलेला एक लाख रुपये रोख रकमेच्या हा पुरस्कार आहे त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील प्रस्ताव पाठवलेल्या उमेदवारांचे लक्ष पुरस्कार प्राप्त उमेदवारांच्या यादी कडे लागले आहे मात्र ती जाहीरच होत नाही. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे, मात्र काही ना काही अडचणी सांगून तो पुढे ढकलला जात आहे. आज पुन्हा एकदा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही पुरस्कार पुढील महिनाभरात वितरित होतील असे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी हे प्रस्ताव पाठविले आहेत त्यांना आता पुन्हा एक महिना तरी या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button