समर्थ विद्यालयात विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण
जाफ्राबाद- येथील समर्थ विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, समाजामध्ये मुलीचा आदर व सन्मान निर्माण व्हावा यासाठी समर्थ विद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. त्याचाच प्रत्यय शाळेतील विद्यार्थिनी च्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करून आला आहे.आपल्या महाराष्ट्रात व देशात आतापर्यंतच्या इतिहासा मध्ये महिलांचे मोठे योगदान असल्यामुळे प्रशासनापुढे व समाजापुढे महिलांमध्ये असणारा आदर हा सातत्याने टिकून राहावा
म्हणून इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या कु. साक्षी प्रकाश निकम या विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थीनीच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने विद्यार्थीनीने देखील समाधान व्यक्त केलं आहे तसेच पालकांनी देखील शाळेचे आभार मानले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय गौतम, प्राचार्य एम.एल.राऊत, शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.पंडित तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172