मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधानांचा वाढदिवस उखाणे स्पर्धा घेऊन साजरा

जालना -17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस. या दोन्हींचा संगम साधत भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेऊन हे दोन्ही दिवस उत्साहात साजरे करण्यात आले .
या विभागाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली भाग्यनगर मधील गणपती मंदिरात गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने घेण्यात आली. त्यात सोबत महिलांच्या उखाणे स्पर्धा आणि गायन स्पर्धा ही पार पडल्या. या प्रभागाचे नगरसेवक अशोक पांगारकर आणि त्यांच्या पत्नी सौ. वैशाली पांगारकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करून या कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाला सौ.आनंदी आयर, सौ. अरुणा फुलमामडीकर, सौ. दिपाली बिनीवाले, अपर्णा राजे, सौ. संपदा कुलकर्णी सौ. सुलभा कुलकर्णी सौ. जान्हवी वैद्य आदींची उपस्थिती होती.
-दिलीप पोहनेरकर,9422219172