Advertisment
जालना जिल्हा

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एन. सी. सी. विद्यार्थ्यांची दौड

जालना- भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व देश हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार “हम फिट तो इंडिया फिट” या कार्यक्रमा अंतर्गत जे.ई. एस. महाविद्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

50 महाराष्ट्र बटालियन औरंगाबाद आणि जे.ई. एस महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसी विद्यार्थ्यांची दौड पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. बी. बजाज यांनी हिरवी झेंडी दाखवून या दौडला सुरुवात करून दिलीया दौड साठी, 50 महाराष्ट्र बटालियन औरंगाबादचे सुभेदार विलास मिलके आणि हवालदार बाल मुरगन के. या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. दौड पार पडल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्राचार्य काबरा, एनसीसी कॅप्टन फुलचंद मोहिते, लेफ्टन श्रीमती एम. के. काळे, सेकंड ऑफिसर जयंत केंद्रे, यशवंत शेजवळ, ऋषिकेश वाघुंडे, एन. टी. सावंत, अमोल मोहिते, यशवंत कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.

जालना जिल्ह्यात या ठिकाणी आहे एनसीसी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी

पार्थ सैनिकी शाळा, खरपुडी. जिल्हा परिषद मुलांची प्रशाला जालना, सी. टी. एम. के. गुजराती विद्यालय जालना, राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना, सेंट मेरी हायस्कूल ,श्री महावीर स्थानकवासी जैन विद्यालय (मराठी माध्यम) आणि जे.ई. एस. महाविद्यालय जालना. प्रत्येक ठिकाणी 50 विद्यार्थ्यांचीच मर्यादा आहे. शाळेत भाग घेतल्यानंतर दोन वर्षासाठी प्रमाणपत्राचा हा कोर्स आहे. तर महाविद्यालयीन स्तरावर दोन वर्ष बी प्रमाणपत्रासाठी आणि पुढील एक वर्ष सी प्रमाणपत्रासाठी असा एकूण तीन वर्षाचा हा कोर्स आहे .सी प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर एनसीसी शी निगडित असलेल्या तत्सम शासकीय नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळू शकते.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button