जालना जिल्हाराज्य
jee परीक्षेत 3091रँक मिळविलेली तन्वी काय म्हणते पहा!
जालना- जेईई मेन्स 2021 सेशन 4 च्या परीक्षेमध्ये येथील तन्वी वेंकटेश पिंप्रीकर या विद्यार्थिनीने 3091 (99.72%) प्राप्त केली आहेत. देशभरातून सुमारे नऊ लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती .त्यामध्ये मागासलेल्या मराठवाडा विभागातून तन्वीने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे जालना शहरात राहून आणि जालन्यात शिक्षण घेऊन हे यश संपादन केल्यामुळे तिच्या यशाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. तन्वीने मिळविलेल्या या यशाबद्दल विशेष मुलाखत घेतली आहे ज्येष्ठ समीक्षक, प्रा. बी. वाय. कुलकर्णी सरांनी.
जालना शहरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर वेंकटेश आणि डॉक्टर वैशाली पिंप्रीकर यांची ही कन्या आहे. तिच्या परिवारामध्ये तिचा भाऊ विक्रम आणि अन्यही ज्येष्ठ सदस्य आहेत.
-दिलीप पोहनेरकर,9422219172.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com