विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
बदनापूर येथील फुले नगर भागात बुशरा कन्ट्रक्शन च्या कामावरील कामगार दौलत रामभाऊ शिनगारे विजपम्प सुरू करताना विजेचा धक्का लागला.त्यांना उपचारासाठी जालना येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
बदनापूर येथील अत्यंत गरीब कुटुंबातील दौलत शिनगारे हा मजूर मागील अनेक वर्षांपासून शहरातील बुशरा कन्ट्रक्शन मध्ये कामगार म्हणून काम करीत होता,सदर कन्ट्रक्शन मालकाने फुलेनगर भागातील एका घराच्या कामाचा काम घेतले होते. दौलत शिनगारे हे रविवारी कामावर गेले असता पाणी आवश्यक असल्याने बोर सुरू करीत असतांना विजेचा धक्का लागल्याने फेकल्या गेले व बेशुद्ध पडले.
उपस्थित लोकांनी उपचारासाठी स्थानिक दवाखाण्यात नेले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने जालना रुग्णालयात पाठविण्यात आले असतांना मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले आहे .
सदर मृत कामगारांवर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी होती. दौलत रामभाऊ शिनगारे वय ४३ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी,३मुली, १ मुलगा,भाऊ,बहीन,वहीणी असा परीवार आहे.