जालना जिल्हा

अंबड- बीड रस्त्यावर 24 तासात दुसरा अपघात ;दोन ठार

 जालना- अंबड हुन बीडकडे जाताना अंबड ते वडीगोद्री रस्त्या दरम्यान शहापूर पाटीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन दोघा जणांना जीव गमवावा लागला. आज पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. विशेष म्हणजे काल याच ठिकाणी देवदर्शन करून जाणाऱ्या एका वाहनाचा आणि दुचाकीचा अपघात झाला होता त्यामध्ये देखील एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. आज 24 तासांमध्ये त्याच ठिकाणी पुन्हा एकदा अपघात होऊन एकूण तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अंबड कडून बीड कडे मैदा घेऊन जाणारा ट्रक क्रमांक के ए 51 AR 0348 हा पंचर झाला. पहाटे चार वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पंचर काढत असतानाच जालन्याहून गेवराई कडे सळई घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 09 सीए0784 या ट्रकने पंचर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचा चालक मोहम्मद रफीक इस्माईल वय 50, राहणार बागेवाडी तालुका चित्तापूर जिल्हा गुलबर्गा (कर्नाटक) हा जागीच ठार झाला. अन्य राजू रा.बेळगाव आणि तुकाराम वाघमारे राहणार मूळेगाव तालुका जिल्हा सोलापूर, हे दोघेही वाहनांमध्ये दबल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर जालना येथील सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले मात्र दोघेही गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.

दरम्यान त्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे, मात्र नेमके कोणाचे नाव कोणते आहे या संभ्रमा मुळे पोलिसांनी नेमका कोणाचा मृत्यू झाला हे अधिकृत सांगितले नाही.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button