Advertisment
जालना जिल्हा

आमचे मागणे हे जनतेसाठी ;माजी मंत्री खोतकर

जालना- राजकारणी माणसाचं मागणं हे स्वतःसाठी कधीही नसतं, ते जनतेसाठीच असतं !जनतेचे कल्याण व्हावं ,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं, हीच खरी अपेक्षा असते . सामान्य माणूस सुखी होऊ दे हेच साकडं आज गणपती बाप्पा ला घातलं आहे.  सर्वांसाठीच गणपती बाप्पा यावर्षी समृद्धी घेऊन आला आहे .असा मनोदय माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

जालना शहरातील मानाचा गणपती असलेला नवयुवक गणेश मंडळाच्या 74 व्या वर्षाच्या निमित्ताने अर्जुन खोतकर आणि त्यांची पत्नी सौ. सीमा अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आज शेवटची आरती झाली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले की मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा गणेशोत्सव शासनाने घालून दिलेल्या अटींच्या चौकटीत राहून साजरा करता आला. गणपती बाप्पा देखील समृद्धी घेऊन आले आहेत ,उद्योजक, व्यापारी ,शेतकरी, यांच्यासोबतच धरणीमाता देखील सुखावली आहे, आणि याचा आनंद निश्चितच आहे. अशाच सुखासमाधानाचे दिवस सामान्य जनतेसाठी कायम राहावेत अशी मागणी आपण बाप्पाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले .याच कार्यक्रमात मंडळाच्यावतीने घेतलेल्या विविध उपक्रमांचे बक्षीस वितरणही  खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आबड, सचिव अल्केश अग्रवाल, जयेश शाह,गौतमचंद आबड, दर्शित आबड, मयूर सावजी, श्रेनिक आबड, प्रकाश गोरंट्याल , निखिल आबड, जितेश तालुका, ओमकार भूतिया, डॉ. ऐ. पी. पटेल, सुनील खर्डेकर, अनुराग बंदूकवाला, श्रीरंग पटेल, जावेद ताम्बोली यांची उपस्थिती होती.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button