गावठी पिस्तुलासह एक तरुण ताब्यात
जालना- गणपती विसर्जनाच्या निमित्ताने कदीम जालना पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी 21 वर्षाचा तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली .त्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी छापा मारून लक्ष्मीनारायण पुरा भागातील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वाय. एच. चव्हाण हे त्यांच्या पथकासह गणपती विसर्जना निमित्त शहरात गस्त घालत होते. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार 21 वर्षीय तरुण लक्ष्मीनारायणपुरा भागामध्ये एक गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे समजले. साडेपाच वाजता मिळालेली ही माहिती त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश टाक यांना दिली आणि त्यांच्या मदतीने सापळा लावून सायंकाळी सव्वा सहा वाजत लक्ष्मीनारायणपुरा भागात फिरत असलेला अखिलेश बालाजी तल्ला वय 21 याला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल सापडले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मनोज हिवाळे यांनी सरकार तर्फे तक्रार देऊन कदीम जालना पोलिस ठाण्यात तल्ला याच्याविरुद्ध घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-दिलीप पोहनेरकर,9422219172