आरोग्य विभागाची शनिवारी-रविवारी परीक्षा; 6 हजार जागांसाठी आठ लाख अर्ज; परीक्षा केंद्रांवर बसणार जामर
जालना- आरोग्य विभागाच्या क आणि ड प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक 25 आणि 26 रोजी परीक्षा होणार आहेत. क प्रवर्गातील 2740 तर ड प्रवर्गातील 3500 अशा एकूण 6240 पदांसाठी ही परीक्षा होत आहे.
याhttps://youtu.be/tBB9VW3vfXQ पदांसाठी आठ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. आणि त्यामधून सुमारे आठ लाख परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालन्यात दिली .
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित covid-19 च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या परीक्षार्थींची covid-19 संदर्भात सर्व काळजी घेतल्या जाईल, असे सांगून परीक्षार्थींनी गैरप्रकार करू नयेत म्हणून संबंधित परीक्षा केंद्रावर जामर बसविण्यात येणार आहेत, त्यामुळे कोणीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, तसे आढळून आल्यास पोलीस यंत्रणा त्या परीक्षार्थी वर योग्य ती कारवाई करेल असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
-दिलीप पोहनेरकर,9422219172