राज्य

मोटार सायकल चोरांच केंद्रस्थान भोकरदन तालुका,26 मोटरसायकल जप्त

जालना-मागील आठवड्यातच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरांची टोळी पकडली होती ,आज पुन्हा भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावातील दोन संशयित मोटरसायकल चोरांना पकडून त्यांच्याकडून 26 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

मोटारसायकल चोरी चे वाढते प्रमाण लक्षात घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा या आरोपींच्या शोधात होती.

माहिती काढत असताना भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावांमधील रामधन स्वरूपचंद बालोद,29, या व्यक्तीने मोटर सायकल चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बालोद याला अधिक माहिती विचारली असता त्याने त्याचा गावातीलच साथीदार पवन प्रताप पिंपळे 25, याच्या मदतीने जालना औरंगाबाद नाशिक अहमदनगर अशा विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आणि कुठे? कोणाला? विकल्या त्यांचे पत्तेही दिले. त्यानुसार गुन्हा शाखेच्या पोलिसांनी एकूण 26 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. बारा लाख 75 हजार रुपयांच्या मोटरसायकल आहेत .या मोटरसायकल चोरल्या प्रकरणी रामधन बालोद आणि पवन पिंपळे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा अन्य एक साथीदार फरार आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी सॅम्युअल कांबळे, सुधीर गायकवाड, सागर बाविस्कर, कृष्णा तगे,गोकुळसिंग कायटे, आदींनी हा तपास लावला.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Related Articles