जालना जिल्हा

तयारी 70 %ची आले 60 %; पोलीस शिपाई चालक पदाकडे उमेदवारांची पाठ

जालना-पोलिस अधीक्षकांच्या आस्थापनेवर असलेल्या पोलीस शिपाई चालक या पदासाठी आज बुधवार दि.22 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती.

त्यामध्ये जे. ई. एस. महाविद्यालय, मत्सोदरी महाविद्यालय, भक्त महाविद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, आणि सी. टी. एम. के. गुजराती विद्यालय याचा केंद्रांचा समावेश होता. या परीक्षा केंद्रांवर एकूण दोन हजार 225 विद्यार्थी परीक्षा देणार होते. त्या दृष्टीने एका खाजगी कंपनीला या परीक्षेसंदर्भात नियोजन दिले होते. आणि पोलिस प्रशासनाला सुमारे 70 टक्के विद्यार्थी परीक्षा देतील असे अपेक्षित होते. परंतु परीक्षा अर्ज भरल्या पासून आत्तापर्यंत दोन वर्षाचा कार्यकाल लोटला आहे .या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षे बद्दलची आशा सोडली सोडली होती, काही विद्यार्थी इतरत्र नोकरीला लागले आणि त्यामधून काही उरले ते आज परीक्षेला आले. अशा एकूण 60 टक्के विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली. दरम्यान सर्वच परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त होता. जे.ई. एस. महाविद्यालयात चार टप्प्यात विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आणि अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन बंदोबस्ताची पाहणी केली, त्यामुळे आज कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,देविदास शेळके, सायबर विभाग विभागाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती पाटील हे या केंद्रावर ठाण मांडून होते. जे.ई. एस महाविद्यालयाचे प्राचार्य देखील केंद्रावर उपस्थित होते. या केंद्रावर एकूण 1032 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती त्यापैकी फक्त 629 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 403 विद्यार्थी गैरहजर होते. 62 टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button