जालना जिल्हा

फोडले किराणा दुकान ;सापडले मोबाईल

जालना- सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना मोंढा भागातील एक किराणा दुकान 13 सप्टेंबर ला चोरट्यांनी फोडले. रामप्रसाद ललित प्रसाद जयस्वाल यांच्या मालकीचे हे दुकान आहे. दुकानातील किराणा सामान, इलेक्ट्रिक सामान, चोरून चोरट्याने गल्यातील पाचशे रुपये देखील चोरले आणि ते थैलीत भरून शेजारच्या दुकानाच्या छतावर ठेवून पळून गेला. ही घटना परिसरातील काही लोकांनी पाहिली आणि रामप्रसाद जयस्वाल यांना माहिती दिली.

त्यानुसार जयस्वाल यांनी सदर बाजार पोलीस ठाणे मध्ये दिनांक 14 सप्टेंबर रोजी गुन्हाही दाखल केला होता. त्यानुसार सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन शोध घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने परिसरातील डीव्हीआर चे फुटेज पोलिसांनी तपासले असता सदरील आरोपी हा लक्कडकोट भागातील असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. मात्र त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर तो फरार झाल्याचे समजले. त्यावेळेस पासून सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश सुपेकर आणि त्यांचे सहकारी आरोपीच्या शोधात होते. काल दिनांक 23 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी शेख हबीब शेख युसुफ, वय 21 वर्ष राहणार लक्कडकोट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या चोरी विषयी चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जालना शहरातील बसस्थानक संभाजीनगर आणि काही हॉस्पिटलमधून पाच मोबाईल चोरी केलेअसल्याचे सांगून ते पोलिसांकडे जमा केले. सुमारे 58 हजार रुपयांचे हे पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून शेख हबीब शेख युसुफ याला ताब्यात घेतले आहे .पोलीस कर्मचारी कैलास खर्डे, अरविंद वर्गणे, दामोदर पवार, दिपक हिवाळे, राजू वाघमारे, सोपान क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button