अंबडला मत्स्योदरी देवीच्या नवरात्रोत्सवाची पूर्व तयारी सुरू
जालना-शासनाने मंदिर उघडण्याचे सुचित करताच गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले मंदिरांचे उत्सव सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्या हिशोबाने तोंडावर असलेल्या नवरात्रोत्सवाची तयारीही सुरू झाली आहे. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे.
जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड येथील मत्स्योदरी देवीच्या नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून रविवार शनिवारी दिनांक 25 रोजी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या सूचनांचे पालन करून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ठरले. त्यामध्ये पारंपारिक पद्धतीने मुले, मुली देवीच्या ओटीमध्ये टाकणे या सह सर्व कार्यक्रम होणार आहेत. तसेच या परिसरातील व्यवसायिक दुकानांचे वितरणासाठी शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर पासून सुरुवातही होणार आहे. या बैठकीला संस्थानचे सचिव तथा नायब तहसीलदार बाबुराव चंडोल, विश्वस्त वसंतराव बल्लाळ, बाबा कटारे आणि व्यवस्थापक कैलास शिंदे यांची उपस्थिती होती.
-दिलीप पोहनेरकर,9422219172