Advertisment
Jalna District

भुलाबाईच्या गाण्यावर नृत्य करून जागतिक कन्या दिन साजरा

जालना- आज जागतिक कन्या दिन. या दिनाचे औचित्य साधून जालन्यात भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने भुलाबाईच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला विभागाच्या वतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्या परिवारात एकच मुलगी आहे अशा परिवाराचा सत्कारही करण्यात आला, आणि भुलाबाईंची गाणी गाऊन जुन्या आठवणींना उजाळा देऊन जुनी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केला गेला.

दरम्यान अशा कार्यक्रमाला बहुतांश ठिकाणी विधवा  महिलांना बोलावणे टाळले जाते आणि त्यांना मानाचे स्थान दिले जात नाही. मात्र येथील कार्यक्रमाला विधवा महिलांनी उपस्थिती लावून आनंदोत्सव साजरा केला, आणि त्यांचे डोळेही भरून आले .

या जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने येथील एका मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला .भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ. शुभांगी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दोनशे महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पूर्वीच्या काळी भुलाबाईंची गाणे आणि त्या स्थापन झाल्यापासून 30 दिवस विविध प्रकारचे खाऊ आणून मुली आनंदोत्सव साजरा करत होत्या. त्यानुसार इथे मुलींसाठी 30 विविध प्रकारचे खाऊ देखील ठेवण्यात आले होते आणि पारंपारिक पद्धतीने गाणे, नृत्य करून हा कन्या दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला विधवा महिलाही उपस्थित होत्या.  समाज विधवा महिलांना, सुहासिनी च्या कार्यक्रमांमध्ये बोलवत नाही याची खंत या महिलांनी बोलून दाखवली, तर आम्ही विधवा आहोत यात आमचा काय दोष ?असा प्रश्नही या विधवा महिलांनी त्यांनी समाजाला विचारला आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थित लहान मुलींना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीसौ. दिपा बिनीवाले ,सौ.शुुभांगी लाड, अपर्णा राजे, सौ अरुणा फुलमामडीकर   सौ.    सुलभा कुलकर्णी, सौ. जान्हवी वैद्य, सौ. संपदा कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.

-दिलीप पोहनेरकर ,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button