केवळ नशीब बलवत्तर म्हणून…….
जालना- जालना -बीड राष्ट्रिय महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापुर जवळ आपघाताची मालीका सुरूच आहे. एकाच आठवड्यात काल पुन्हा तिसरा अपघात झाला आहे. मागील दोन अपघातामध्ये आपघातामध्ये आतापर्यंत तिघाजणांचा मृत्यु झाला आहे. मात्र काल केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दि.24 रोजी सांयकांळी 7.30 वाजेच्या सुमारास गल्हाटी नदिच्या पुलावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.हि धडक एवढी जोराची होती कि धडकेमध्ये अक्षरशः एक ट्रक हा गल्हाटी नदिवर असलेल्या पुलाचे कठाडे तोडुन अंदाजे 40 फुट उंचिवर असलेल्या पुलावर लटकला आहे.बंगळुर येथुन दिल्ली येथे अद्रक घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे 09 सी जी 5556 व अकोला येथुन सोलापुर येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक यांची अंबड तालुक्यातील शहापुर नजीक सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास गल्हाटी नदिच्या पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली .यामध्ये अकोला येथुन सोलापुर येथे कोळसा घेऊन जाणारा ट्रक पुलाचे कठाडे तोडुन पुलावर लटकला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच गोंदि पोलीस स्टेशन चे पोलीस उनिरीक्षक गजानन कौळासे,कुलगुडे व पथक घटनास्थळी दाखल होऊन एकेरी वाहतुक सुरळीत केली आहे . आपघातातील एक ट्रक पोलीस स्टेशन गोंदि येथे लावण्यात आला असुन तपास व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
-दिलीप पोहनेरकर,9422219172