Jalna District

….तर ते बुधवारी जलसमाधी घेणार

जालना- मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत दहा लाख रुपये देण्याचे तत्कालीन राज्य सरकारने जाहीर केले होते.

त्यानंतर सरकार बदलल्याने हा विषय मागे पडला. तसेच सकल मराठा समाज आणि साष्ट पिंपळगाव यांच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते .मात्र तरी देखील शासनाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता सरकारने उद्या दिनांक 28 पर्यंत अध्यादेश काढून बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी दिली नाही तर आपण बुधवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी शहागड येथील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी घेऊन जलसमाधी घेऊ, असा इशारा मराठा समाजाचे आंदोलन करते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

-दिलीप पोहनेरकर, edtv news jalna,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button