मोडकळीस आलेल्या घरात नरबळी देण्याचा प्रयत्न; महिलेने सांगितली आपबिती
जालना- गुप्तधनासाठी मोडकळीस आलेल्या घरात स्वतःच्या पत्नीचा नरबळी देण्याचा अघोरी प्रयत्न जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे घडला.
या याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी महिलेच्या पतीसह अन्य एका आरोपीला अटक केली असून या दोघांना मदत करणारी तिसरी मांत्रिक महिला मात्र अजून फरार आहे. संतोष पिंगळे हा गुप्तधनासाठी अन्य एकाच्या मदतीने स्वतःच्या पत्नीचा नरबळी देण्याच्या तयारीत होता. बुधवारी रात्री त्याच्या मोडकळीस आलेल्या घरांमध्ये त्याने मांत्रिक महिलेसह प्रयत्न केला ,मात्र संतोष ची पत्नी सीमा पिंपळे हिने आरडाओरड करून आणि स्वतःच्या मुलांना उठवून परिवाराची सुटका करून घेतली. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार वडिलांना सांगून त्यांच्यासोबत टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172