Talukaजालना जिल्हा

रास्ता रोको करून काँग्रेसचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

जालना-जाफाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी आदोंलन करून भारत बंद ला जाहीर पाठिंबा दिला. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या पिकाला हमी भाव देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा शेतकऱ्यां विरोधी कायदा रद्द करावा या सह शेतकऱ्यांना अतिवृष्टी ची मदत तात्काळ बँक खात्यात जमा करावी आदी मागण्याचे निवेदन जाफाबाद तहसीलदार यांना देऊन केंद्र सरकार वर तीव्र नाराजी व्यक्त करुन शेतकरी आत्महत्या करत आहेत कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या संकटात बळीराजा सापडला चोहोबाजूंनी शेतकऱ्यांचा कोंडमारा होत आहे.

बँकेच्या दारात उभे राहून पिक कर्ज बँक देत आहे कर्ज माफी झाली परंतु आँपलोड केलेल्या शेतकऱ्यांना किती दिवस हुलकावणी देणार शासनाने नियमित कर्ज भरणा करणाऱ्या प्रोत्साहन योजना जाहीर केली ती अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही याकडे केंद्र सरकार व राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांनी दिला.

बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक बो-हाडे यांनी शेतकरी आदोंलन दरम्यान बोलताना महटले, जेव्हा शेतात पिकविलेला माल शेतकरी मार्केटमध्ये विकण्यासाठी आणतो तेव्हा मात्र भाव पडतो मागच्या महिन्यात सोयाबीन चा भाव बारा हजार रुपये होता आता शेतकऱ्यांची सोयाबीन निघते भाव गडगडला या मुळे शेतकरी शेती पुरत नाही म्हणून आत्महत्या सारख्या मार्ग निवडत आहे सरकार किती शेतकऱ्यांचा बळी घेणार याकडे सरकारने लक्ष देऊन जगाचा पोंशिदा म्हणून ज्या उपमा देता त्यांना न्याय द्या असे दिपक बो-हाडे ,सुरेश गवळी, उत्तम उगले ,कुंडलिक मुट्ठे, विनोद दिघे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी दमोधर वैद्य महेबुब टेलर अँड डिघे ज्ञानेश्वर शिंदे पाडुरंग भुतेकर शेख मोहीन सय्यद महेमुद फारेस खान लतीफ कुरेशी दिनकर भोपळे उमेश सुतार मंगेश उबाळे राजू जाधव वशीम जहागीरदार ,हरेस भाई, रियाज खान, बबलू भाई, हनिफ कुरेशी, मोईज भाई व बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button