1.
Taluka

जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा


बदनापूर तालुकयातील जवसगाव येथे सुरू असलेल्या ड्रायपोटर्‍ कामामध्ये सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी जवसगाव शिवारातून हजारो ब्रास गौन खनिजाचा अवैध उपसा करुन या कामात वापर सुरू आहे. असलयाची कोणतीही रॉयल्टी न भरता जवसगाव शिवारातील अवैध गौन खनीज उपसा करणाऱ्यावर कारवाईची करण्याची मागणी जवसगाव ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे जेएनपीटी अंतर्गत ड्रायपोर्टचे काम सुरू असून सदरील काम तेजर सुपरस्ट्रक्चर व प्रोगोसिव्ह कन्स्ट्रक्शन कंपनी हे संयुक्तपणे करत आहेत. या ठिकाणी आरओबी (रोड ओव्हर ब्रिज) कामासाठी लागणारे दगड, माती, मुरुम, वाळू या कंत्राटदाराने चक्क जवसगाव शिवारातील अवैधरित्या उत्खनन करून वापरण्यात आल्याचा आरोप जवसगाव ग्रामपंचायतने केलाआहे. या कामासाठी जवसगाव शिवारातील हजारे ब्रास माल ब्रिज कामासाठी वापर केलेला आहे. याची कोणतीही माहिती गौण खनीज विभागास व तहसील कार्यालय यांना न देता व परवाना न काढता रॉयल्टी न भरता गौण खनीज मालाचा पुलाच्या कामासाठी भरपूर प्रमाणात वापर केलेला आहे. त्यासाठी संबंधित कंपनीवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत जवसगावच्या वतीने सरंपच अयोध्या गारखेडे, उपसरंपच मनिषा गारखेडे, रामकिसन गारखेडे, भरत गारखेडे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारयांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button