Jalna District

शेतकऱ्यांना मदत करण्याची टाळण्यासाठीच ई पीक पाहणी चे नाटक

शेतकऱ्यांना मदत करण्याचे टाळण्यासाठीच सरकार ई पीक पाहणी चे नाटक करीत आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतात जाऊन फोटो काढणे आणि ती माहिती भरणे बंधनकारक करीत आहे, मात्र सद्यपरिस्थितीत शेतात जाणे मुश्कील झाले आहे. आणि त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे काही ना काही बहाणा करून शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवण्याचे नाटक हे राज्य सरकार करीत आहे .असा आरोप माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

त्याच सोबत बागायती जमिनीला एक लाख रुपये हेक्टरी तर कोरडवाहू जमिनीला 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

Related Articles