Jalna DistrictTaluka

केळणा नदीला पूर; भोकरदन मध्ये घरांची पडझड

भोकरदन- शहरासह तालुकाभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या नाल्यांना पूर आलेला असून केळणा नदीवरील जाफराबाद पुलावरून पाणी वाहत असल्याने दिवसभर विदर्भासह अनेक गावांचा संपर्क तुटला.यावेळी खाजगी व प्रवाशी वाहतुकीच्या गाड्यांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. दरम्यान वाहनांनी व नागरिकांनी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तसेच नदीकाठच्या रहिवाश्यांनी सुरक्षित स्थळी राहावे असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरांची पडझड झाली तर जुन्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे.परिसरातील अनेक भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. या वेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख व इतर नगरसेवकांनी सदर नुकसानीची पाहणी करून प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे सांगितले. मुसळधार पावसामुळे शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

उल्हासराव देशपांडे यांचे राहते घर कोसळले
मुसळधार पावसामुळे शहरातील लालगढी गल्लीतील रहिवासी उल्हासराव रामराव देशपांडे यांच्या राहत्या घराची पडझड झाली. यावेळी तलाठी कल्याण माने यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी करून घराची स्थिती धोकादायक असल्याचे सांगत त्यांना इतरत्र हलविले. त्यांना स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण घर कोसळले. वेळीच घर सोडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button