Advertisment
Jalna District

अंबडचे वाईन शॉप व्यवसायिक महेंद्र संगेवार यांचा विहिरीत आढळला मृतदेह

जालना- अंबड शहरातील वाईन शॉप चे मालक महेंद्र बाबूराव संगेवार यांचा मृतदेह आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विहिरीत मधून शोधून काढला आहे. जालना येथील अग्निशमन दल आणि अंबड पोलिसांनी हा मृतदेह शोधून काढला आहे.

अंबड शहरातील शिवनगर भागात राहणारे महिंद्र बाबुराव संगेवार यांचे वाईन शॉप चे दुकान आहे. काल दिनांक 28 रोजी महेंद्र संगेवार हे त्यांच्या दुकानातील नोकर राधाकिसन पिवळ, यांना थोड्या वेळात बाहेर जाऊन येतो असे सांगून बाहेर गेले. मात्र बराच वेळ ते आले नाहीत. त्यामुळे पिवळ यांनी ही माहिती महेंद्र संगेवार यांच्या घरच्यांना दिली. संगेवार यांच्या परिवाराने काल रात्री आणि आज सकाळी देखील त्यांचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र काही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे सकाळी अंबड पोलीस ठाण्यात रूपाली संगेवार यांनी महेंद्र बाबूराव संगेवार वय51, हरवल्याची तक्रार नोंद केली या तक्रारीच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी तपासाची सूत्रे हलवली. यादरम्यान जालना अंबड रस्त्यावर मुख्य रस्त्याच्या बाजूला लालवाडी शिवारात एका विहिरीत संगेवार यांच्या चपला तरंगताना दिसून आल्या, यावरून अंबड पोलिसांनी अंदाज लावून या विहिरीत शोधमोहीम सुरू केली. त्यासाठी जालना येथील अग्निशमन दलाच्या यंत्रणेलाही पाचारण करण्यात आले होते. तीन-चार तासाच्या प्रयत्नानंतर साडेचार वाजेच्या सुमारास महिंद्र बाबुराव संगेवार यांचा मृतदेह अग्निशमन यंत्रणेच्या गळाला लागला. दरम्यान काल पासून हे व्यावसायिक  गायब होते. आज हा तपास लावण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण, पोलीस उपनिरीक्षक श्री  साठे ,पोलीस कॉन्स्टेबल श्री मते हे घटनास्थळी उपस्थित होते.

-दिलीप पोहनेरकर, edtv 9422219172

 

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button