सोनक पिंपळगाव चा पूल तुटला; लाल परीचा मार्ग बंद
जालना- अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील पूल तुटल्यामुळे परिसरातील सुमारे 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला आहे.
ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून किमान दुचाकी वाहने जाणे -येण्यासाठी तरी रस्ता केला आहे, मात्र लालपरी अजूनही बंदच आहे .जालना अंबड रस्त्यावरून सुखापुरी पाटी वरून सोनक पिंपळगाव मार्गे पुढे वडीगोद्री आणि श्रीक्षेत्र पैठण कडे हा रस्ता जातो याच विरुद्ध दिशेला पूर्वेकडे तीर्थपुरी आणि परभणी कडे जाणारा हा रस्ता आहे. रस्त्यावर रहदारी भरपूर आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे या गावा शेजारीच असलेला फुल वाहून गेला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. पूल तूटल्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटलेला आहे, विशेष करून अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहावी म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने दुचाकी आणि लहान वाहनांसाठी कसाबसा हा रस्ता चालू करण्यात आला आहे .प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या मुख्य मार्गाचे काम करावे अशी मागणी गावचे सरपंच शंकर धुमाळ यांनी केली आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172