Jalna DistrictTaluka

वाहतूक शाखेच्या पोलिसाची दुचाकीस्वाराला पत्नीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ

जालना- चार महिन्यापूर्वी जालना जिल्हा पोलिस दलाला लागलेला कलंक मिटता मिटत नाही ,आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी  भर टाकत आहे. हा सर्व प्रकार कमी होता की काय? म्हणून आता शहर वाहतूक शाखा ही पोलीस प्रशासनाला काळीमा फासत आहे. शहरात वाहतुकीचे बारा वाजले असताना  हात गाडीच्या बाजूला उभे राहून बघ्याची भूमिका घेणारे शहर वाहतूक शाखेचे पोलीस आता आपली जबाबदारी झटकून दुसऱ्याच्या मागे लागले आहेत. भर रस्त्यावर असलेल्या हात गाड्यांना हटवायचे सोडून नागरिकांच्या वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण करून उभ्या असलेल्या या हातगाडी वाल्यांना दंड करण्याचा सोडून नागरिकांनी जर रस्त्यावर गाडी लावली तर त्याच्यासोबत अरेरावी करून पावती फाडण्यात अच् धन्यता मानणारे हे शहर वाहतुकीचे पोलीस आता तर यांची हिम्मत एवढी वाढली आहे ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना हेरून त्यांना दंड केल्या जातोच मात्र त्यासोबत त्यांना बक्षीस म्हणून की काय त्यांच्या घरच्या महिला, आई ,पत्नी यांच्यावर अश्लील भाषेत, असभ्य भाषेत शिवीगाळ ही केले जाते.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस सुरेश राठोड यांनी एका ग्रामीण भागातील दुचाकीस्वाराला सोबत अश्लील भाषेत आणि त्याच्या पत्नीवर दिलेल्या शिवीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांवर जनतेचा असलेला रोष आणखीनच वाढायला भर पडणार आहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button