Taluka

शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

परतुर तालुक्यातील काऱ्हाळा येथील शेतकरी मनोहर लिंबाजी शेळके यांच्या शेतातील दीड एक्कर ऊस दि.27 रोजी शॉटसर्किट मुळे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कारखान्याची ऊस नेण्यास झालेली दिरंगाई ही या शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याचे शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे.शेळके यांच्या ऊस तोडीची नोंद जानेवारी महिन्यातील असून,आजपर्यंत वारंवार कारखाना व त्या संबधीत कार्यालयात खेटा मारल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.कारखान्याडून ऊस नेण्यास होत असलेल्या दिरंगाईचा फटका शेतकऱयांना बसत आहे.संबधीत ऊसाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून या शेतकऱ्यास प्रशासनाने व कारखान्याने मदत करण्याची मागणी होत आहे.

Related Articles