रोहन वाडीच्या पुलासाठी रासपाचे जलसमाधी आंदोलन
जालना- जालन्याहून घनसांवगी कडे जाणाऱ्या रोहन वाडीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज या पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
जालना ते घनसांवगी हा एक अंबड मार्गे देखील रस्ता आहे मात्र तो दूर पडत आहे आणि जालना ते घनसांवगी( रोहन वाडी) मार्गे तयार झालेल्या नवीन रस्त्यामुळे अंतरही कमी आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे आणि या पुलाच्या काठावरच आणखी एक शाळा आहे.
पलीकडच्या ग्रामीण भागाचा जालन्याशी भाजीपाला, दूध आणि अन्य शेती उत्पादना विषयी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत व्यवहार चालतात, त्यामुळे हा महत्त्वाचा रस्ता आहे. दुर्दैवाने जालना शहराच्या बाजुलाच एक छोटासा फूल आहे त्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद असतो. पाऊस थांबून तीन दिवस झाले मात्र आजही या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तो सर्वांसाठीच धोकादायक बनलेला आहे .पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेची आणि तसेच आता 4 तारखेपासून सुरू होणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या फुलाची त्वरित दुरुस्ती करावी आणि उंची 10 फुटापर्यंत वाढवावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही याची दुरुस्ती न झाल्याने जिल्हा संपर्कप्रमुख ओम प्रकाश चितळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मात्र उपस्थित तालुका पोलिसांनी हे आंदोलन चालू ठेवण्याला विरोध केला. या आंदोलनामध्ये मराठवाडा संपर्क प्रमुख तथा अंबड नगरपालिकेचे सभापती अशोक लांडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोजने, वकील संघाचे अध्यक्ष अडवोकेट श्रीराम भुसे, संभाजी चुनखडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172