जालना जिल्हा

माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

जालना अंबड चौफुली रेवगव रोड दरम्यान काही ठिकाणी मोकळा भाग आहे .या मोकळ्या भागातील झाडांना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली ।याच वेळी सोसाट्याचा वारा देखील सुरू होता. त्यामुळे वणव्यासारखी ही आग सर्वत्र पसरली आगीच्या उडणार्‍या ठिणग्या क्षणार्धात सर्वत्र पसरल्याने ठीक- ठिकाणी आगीचे लोळ दिसू लागले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. याच परिसरात दोन मोठे हॉस्पिटल आहेत आणि त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पसरणारी आग ही अनेकांना घाबरून टाकणारी होती परंतु नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळावर येऊन ही आग आटोक्यात आणली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच अवघ्या दहा मिनिटात दोन बंब घटनास्थळावर दाखल झाले आणि रात्रीच्या अंधारामध्ये बॅटरीच्या उजेडात ही सर्व आग आटोक्यात आणली. वाऱ्यामुळे आगीच्या ठिणग्या उडत आहेत हे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन विभागाचे अधीक्षक एस एम सोनवणे हे देखील घटनास्थळावर उपस्थित होते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button