हतबल झालेला बळीराजा आत्महत्याची बोलतोय भाषा
जालना- पावसाळ्याच्या सुरुवातीला वेळेवर पडलेला पाऊस सर्वांनाच सुखावून गेला .वेळेवर झालेल्या पेरण्या आणि वेळेवर वाढीस लागलेले पीक पाहून सर्वांच्या चेहर्यावर समाधान होतं .मात्र दोन महिन्यातच या आनंदावर विरजण पडलं ,पावसाने दडी मारली आणि बळीराजा चे डोळे आभाळाकडे लागले. सुदैवाने पोळ्याच्या आधी पाऊस पडला बळीराजा सुखावला आणि पोळा सण उत्साहात साजरा केला .
पोळ्यासाठी आलेला पाऊस अजूनही परत जाण्याचे नाव घेत नाही. मुसळधार पावसामुळे शेतामध्ये तळे साचले आहे .
बागायती पिकाचे तर नुकसान झालेच आहे हाती आलेल्या मोसंबीचे पीक अतिवृष्टीमुळे गळून पडत आहे, कापूस सोयाबीन चे नामोनिशानही राहिले नाही. अशा परिस्थितीमध्ये बियाणे खरेदीसाठी खाजगी सावकाराकडून घेतलेली रक्कम, शेती मशागतीसाठी बँकेचे काढलेलं कर्ज, हे फेडायचं कसं? उत्पादनच नाही झालं तर घरी खायचं काय? या चिंतेने बळीराजाला ग्रासला आहे. जालना जिल्ह्यात सर्वत्र ही परिस्थिती आहे सर्वात जास्त ओल्या दुष्काळाची तीव्रता ही अंबड आणि घनसांवगी तालुक्यात जाणवत आहे .त्याच अंबड तालुक्यातील शेतकऱ्याची ही व्यथा.
दिलीप पोहनेरकर,, edtv news,९४२२२१९१७२