रस्ता सुरळीत करण्यासाठी नगरसेवकाचे लाक्षणिक उपोषण
जालना -जालना शहरातील मुख्य रस्त्या असलेल्या काद्राबाद ते शिवाजी पुतळा दरम्यान असलेली मूर्ती वेस तीन महिन्यांपूर्वी पडली आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती वेस आहे. एक अवजड वाहन येथून जात असताना ती पडली आणि त्या दिवसापासून नगरपालिकेने हा रस्ता बंद केला आहे, तो आजही बंदच आहे.
शिवाजी पुतळा परिसर हाा शहरातील मध्यवस्तीचा परिसर आहे. या परिसरात नामांकित हॉटेल्स, शासकीय कार्यालय, बँका, शाळा ,अशी महत्त्वाचे प्रतिष्ठाने आहेत आणि त्यातच आता शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवरून शाळेत जावे लागत आहे. वेळ आणि इंधनाचा खर्च वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक अजय भरतिया यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. नगरपालिका आणि वक्फ बोर्डामध्ये सुरू असलेलं पत्राचे युद्ध थांबून नागरिकांसाठी हा रस्ता मोकळा करुन द्यावा अशी आग्रही मागणी केली. दरम्यान नगराध्यक्ष सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी मध्यस्थी करून अजय भरतिया यांचे हे उपोषण सोडविले आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,९४२२२१९१७२