Advertisment
Jalna District

मेंढपाळाचा विहिरीत सापडला मृतदेह

जालना -नवीन जालना भागातील गांधी नगर मध्ये राहणारे मेंढपाळ अब्दुल जब्बार खान यांचा मृतदेह आज सकाळी रेल्वे पटरी च्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये तरंगताना  पोलिसांना आढळून आला.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने हा मृतदेह अब्दुल जब्बार खान यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. अब्दुल जब्बार खान हे सुमारे 65 वर्षीय व्यक्ती सुरुवातीपासूनच शेळ्या-मेंढ्या चारण्याचा व्यवसाय करत होते. रेल्वे पटरी च्या बाजूने बाराही महिने ते शेळ्यांना चारण्यासाठी आणत होते.

२ तारखेला संध्याकाळी ते घरी परत आलेच नाहीत, म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात अब्दुल जब्बार खान हरवल्याची तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत असताना आज सकाळी रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या उड्डाणपुलाजवळील एका विहिरी मध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना  पोलिसांना मिळाला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला.

दरम्यान तीन दिवसांपूर्वी चा मृतदेह असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाचे जवान राहुल नरवडे, किशोर सगट, नागेश घुले, सागर गडकरी, सादेक अली, विनायक चव्हाण, आणि तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक उत्तम देशमुख प्रदीप झरेकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून हे मदत कार्य केले.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button