“स्नेहालयाची “”सद्भावनायात्रा” जालन्यात

जालना- युवकांमध्ये सद्भावना असावी, देश प्रेमाविषयी प्रेरणा जागृत राहावी आणि विविध समाजसेवकांच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा राखण्यासाठी कसा प्रयत्न केला जातो.
या विषयांच्या अभ्यासासाठी अहमदनगर येथील स्नेहालय सामाजिक संस्थेच्या वतीने सद्भावना सायकल यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा काल जालन्यात आली आणि आज पुढील प्रवासाला रवाना झाली. जे. ई.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवनारायण बजाज यांनी हिरवी झेंडी दाखवून या यात्रेला रवाना केले. २ ऑक्टोबरला अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यापासून १०० युवकांना घेऊन ही सद्भावना सायकल यात्रा निघाली आहे. ७५ दिवसांच्या प्रवासानंतर १५ डिसेंबरला नौखाली येथे पोहोचेल. ही यात्रा पाच राज्यातून जाणार आहे. महाराष्ट्र ,छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, आणि पश्चिम बंगाल, असा सुमारे ३ हजार किलोमीटरचा प्रवास या सायकल स्वरांचा होणार आहे. विशेष म्हणजे या सायकल यात्रेमध्ये दहा वर्षाच्या बालकापासून ते साठ वर्षाच्या वयोवृद्ध महिलांपर्यंत सायकल स्वार आहेत.
काल जालन्यात आल्यानंतर यात्रेचे ठिकाणी स्वागत करण्यात आले. जे.ई. एस महाविद्यालयामध्ये या सद्भावना यात्रेचा मुक्काम होता.
.त्यांच्या स्वागतासाठी महाविद्यालयाची सर्व यंत्रणा झटत होती. त्यामध्ये प्राचार्य शिवनारायण बजाज, माजी प्राचार्य जवाहर काबरा, डॉ. यशवंत सोनूने, डॉ. महावीर सदावर्ते, कॅप्टन फुलचंद मोहिते, डॉ. सोनवणे आदींचा समावेश होता.
-दिलीप पोहनेरकर,edtv news,९४२२२१९१७२