केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो वाहून जायचा वाचला
जालना – जालना शहराच्या बाजुलाच असलेल्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे या पाण्यातून दुचाकी काढत असताना आज एक तरुण वाहून जाता जाता वाचला आहे.
तालुक्यातील रोहनवाडी सारवाडीव कडे जाणारा कुंडलिका नदीवरील पूल पावसाळ्यात नदीला पाणी आल्यामुळे घनसावंगी कडे जाणारा हा मुख्य रस्ता बंद पडतो. जवळपास 40 गावाचा संपर्क यामुळे तुटतो गेल्या काही दिवसापासून या पुलावर अनेक दुर्घटना घडत आहेत, वाहून केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत , याबाबतीत सामाजिक संघटना, परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही. पुलावरुन पाणी वाहत असताना देखील पूल ओलांडणे धोकादायक आहे हे समजत असून देखील काहीजण अडचणीमुळे शहराकडे येण्यासाठी पुलावरून पाणी वाहत असताना धोका पत्करतात आणि पुढे जातात आणि स्वतःचा जीव गमावतात. अशीच एक घटना आज सकाळी 5 ऑक्टोबर 2021 घडली. एक तरुण दुचाकीवरून त्याच्या मित्रासोबत रोहनवाडी कडून जालना कडे वाहत्या पाण्यात पुलावरून येत असताना अचानक खड्ड्यात त्याचे पुढचे चाक गेले आणि त्याचा तोल गेला व तो कोलमडून पुलाच्या खाली पडला आणि वाहू लागला परंतु थोडे पुढे वाहत गेल्यावर पाणी कमी असल्यामुळे त्याला उठता आले आणि त्याच्या पाठीमागचा मित्र मोठमोठ्यानं मदतीची याचना करू लागला. थोड्याच वेळात तो कसाबसा पाण्याबाहेर आला अत्यंत घाबरलेला हा तरुण वाचल्यामुळे त्याला हायसे वाटू लागले.
अशा अनेक घटना या पुलावर वारंवार घडत आहेत तरी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यांनी आणि संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालने गरजेचे आहे. तरच या घटना टाळल्या जातील जनतेचा नाईलाज असल्याने त्यांना शहराकडे यावे लागते कधी कधी दवाखान्यात तर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आणि शेतकऱ्यांना मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणि दूधवाला यांना दूध विक्रीसाठी शहराकडे यावेच लागते ते हा प्रवास टाळू शकत नाही तसेच अनेक चाकरमान्यांना नोकरीसाठी या पुलावरून ये-जा करावी लागते या सर्वांचा जीव धोक्यात आहे.
या पुलाची उंची वाढविण्यासाठी राष्ट्रवादी समाज पक्षाच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली याच पुलावर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र, तो पोलिसांनी हाणून पाडला.
-दिलीप पोहनेरकर,edtv news’९४२२२१९१७२