शिक्षकांच्या पैशातून येणार जि.प.ला दोन रुग्णवाहिका
जालना-शिक्षकांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं! याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. आणि ते जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांनी दिलेल्या योगदानातून दिसून येतं.
फक्त जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या योगदानातून जालना जिल्ह्यामध्ये क्रिडा प्रबोधनी ही नामांकित संस्था उभी राहिले आहे. या संस्थेत क्रीडा क्षेत्रात नाव कमविण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इथे निवासी विद्यार्थी असून याचा पूर्ण खर्च हा शिक्षकांनी जमा केलेल्या निधीमधून केल्या जातो. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी हा उपक्रम सुरू केला होता.
हा उपक्रम सुरू असतानाच आणखी नवीन एका नवीन उपक्रमाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. आरोग्य सभापती पूजा सपाटे यांनी जालना जिल्हा परिषदेला कोविड रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका खरेदी करायचे आहेत आणि त्यासाठी शिक्षकांनी मदत करावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक शिक्षक, केंद्रप्रमुख यांनी जून 2019 च्या वेतनामधून प्रत्येकी पाचशे रुपये या रुग्णवाहिकेत साठी जमा केले आहेत. सुमारे 28 लाख 52 हजार 500 रुपयांची ही रक्कम आहे, आणि ती सध्या जिल्हा परिषदेच्या खात्यामध्ये जमा आहे .
लवकरच दोन रुग्णवाहिकेची निविदा काढून त्या खरेदी केल्या जातील अशी माहिती शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी दिली. प्राथमिक विभागाच्या 5700 शिक्षकांनी 27 लाख 9 हजार 500, माध्यमिक च्या 257 पैकी 218 शिक्षकांनी प्रत्येकी पाचशे रुपये म्हणजेच एक लाख नऊ हजार रुपये आणि 68 केंद्रप्रमुखांनी प्रत्येकी पाचशे रुपये असे 34 हजार रुपये. सर्व मिळून एकूण 28 लाख 52 हजार 500 रुपये या शिक्षकांच्या वेतनातून जमा झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी जर ठरवले तर चांगल्या गोष्टी घडू शकतात याचं हे एक ज्वलंत उदाहरण म्हणता येईल
– दिलीप पोहनेरकर,edtv news,९४२२२१९१७२