Advertisment
जालना जिल्हा

कोरोना रुग्णालयात नातेवाईकांना थांबण्यास मज्जाव; पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी


जालना
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन चा परिणाम आता हळूहळू दिसायला लागला आहे. त्यातच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचीही कोरोना तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे हा आजार पसरवणारे आता बऱ्यापैकी कमी झाले आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांप्रमाणेच कोरोना रुग्णालयाच्या समोर रुग्णाच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. यामधून देखील हा आजार पसरत होता .प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हा परिसर आता पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. आणि कदीम जालना पोलीस देखील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून इथे गर्दी करण्यास मज्जाव करीत आहेत ,त्यामुळे हा परिसर आता मोकळा झाला आहे .या परिसराची पाहणी पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर आणि कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आज केली .
दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांची विविध सेवाभावी संस्थांनी रुग्णालयाबाहेर भोजन आणि निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना याचा दिलासा मिळाला आहे.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button