Jalna DistrictRanraginiSerials

आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! नगराध्यक्ष सौ .संगीता गोरंट्याल

जालना- आपण नेहमीच विद्यार्थी राहायला हवं! आणि तसं राहिलं तरच आपण नवीन काही शिकू शकतो .असे विचार जालन्याच्या नगराध्यक्षा सौ. संगीता कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केले .ई .डी. टीव्ही न्यूज साठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दुसऱ्या माळेचा रणरागिनी म्हणून त्यांनी हे विचार मांडले.

यासोबत पती आमदार कैलास गोरंट्याल यांच्या राजकारणातील चढ-उतार आणि परिवारात असलेलं राजकीय वातावरण याबद्दल फारसा ताण न घेता “राजकारणात हे चालतच राहतं” असे म्हणून चढ-उतार आला न घाबरता प्रयत्न करीत राहिले पाहिजेत आणि म्हणूनच आपण कायम विद्यार्थी राहायला हवं असेही त्या म्हणाल्या.

नवरात्रोत्सव उत्सव म्हटलं की महिलांच्या आनंदाला आलेले उधाण त्यांनी कधी काळी अनुभवलेला आहे. देवीचे माहेरघर म्हणून नगर जिल्ह्याला ओळखले जातं आणि त्या नगर जिल्ह्याच्या या कन्या आहेत. मूळच्या नगर येथील  सौ. संगीता  या ज्या वेळेस जालन्यात गोरंट्याल परिवाराशी जोडल्या गेल्या त्यावेळेस त्यांना तेलुगु भाषा येत नव्हती ,आणि गोरंट्याल परिवार हा पद्मशाली असल्यामुळे ते  तेलगु भाषेशी जोडल्या गेलेले आहेत. आजही प्राधान्याने पद्मशाली समाज हा तेलगू भाषेचा वापर करतो . परंतु त्यांना तेलुगु भाषा आली नाही तरी महिनाभरातच त्यांनी तेलुगु भाषा आणि तेलुगू माणसांना आपलंसं केलं. एवढेच नव्हे तर आज आमदार कैलास गोरंट्याल हे देखील चांगलं मराठी बोलायला शिकले आहे. सौ गोरंट्याल यांनी अल्पावधीत आत्मसात केलेल्या या बदलामुळे गोरंट्याल परिवारावर आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.

घरात राजकीय वातावरण तर होतंच, त्याच्यातून थोडं -थोडं बाळकडू त्यांना मिळत गेलं आणि आज जालन्याच्या नगराध्यक्ष म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. अनेक वेळा अशा मोठ्या पदावर गेलेल्या महिलांच्या बाबतीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं ग्रामीण भागातील सरपंच महिला असो अथवा मोठ्या पदावर पोचलेली लोकप्रतिनिधी महिला असो ,महिला लोकप्रतिनिधी म्हटलं कि तिचा कारभार हा बहुतांशी तिचे पतीदेवच पाहतात, आणि निर्णय घेतात. परंतु सौ .संगीता गोरंट्याल या आजही नगरपालिकेची स्थायी समितीची सभा असुद्या, सर्वसाधारण सभा असो किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम असो .त्या स्वतः  सक्षम पणे हाताळतात आणि हे शिक्षण ही कला त्यांचे राजकीय गुरू असलेले अर्थात त्यांचे पती विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून त्यांना मिळालेली आहे असे त्यांनीच सांगितले आणि म्हणूनच त्या पतिला राजकारणाततील आपले गुरु असे म्हणून संबोधतात.

 

जालना शहराची जबाबदारी सौ. संगीता गोरंट्याल यांच्याकडे तर जालना तालुक्याचा  जबाबदारी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे आहे. या या दोघांनाही राजकीय ताण तणाव आणि कार्यकर्त्यांचा गराडा सहन करावा लागतो .आशा या कामकाजाच्या तणावातून तणावमुक्त होण्यासाठी हा परिवार आजही नित्यनियमाने योगा करतो. प्रत्येकाचे वेगवेगळे छंद असतात तसाच वेगळा छंद नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचाही आहे.. एक महिला म्हणून नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतानाच ,आपल्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छंद जोपासण्यासाठी त्यांनी संगीत क्षेत्राची निवड केले आहे. सुगम संगीतामध्ये विशारद परीक्षेच्या शेवटच्या वर्षाची तयारी त्या करत आहेत. तर शास्त्रीय संगीतामध्ये देखील त्यात तरबेज आहेत. दिवसा वेळ मिळो अथवा न मिळो रात्री  रियाज करण्यासाठी त्या अवश्य वेळ काढतात. नवरात्रीच्या निमित्ताने  जनतेच्या काही अपेक्षा नगराध्यक्ष पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये महत्त्वाची अपेक्षा अशी होती की, जालना शहरांमध्ये आठवडी बाजार भरतो. शहराच्या सभोवताली ग्रामीण भाग असल्यामुळे फळे भाजीपाला विक्रेते विशेष करून महिला या शहरांमध्ये येतात .मात्र या महिलांसाठी शहरात कुठेही शौचालय नाही. त्यामुळे दिवसभर बाजारात फिरत असलेल्या या महिलांची कुचंबना होते. आणि त्यातूनच अनेक आजारही जडतात .त्यामुळे महिलांच्या अडचणी बद्दल सौ. गोरंट्याल म्हणाल्या,” शहरातील नगरपालिकेच्या मालकीचे जिथे- जिथे व्यापारी संकुल होत आहे, तिथे या महिलांच्या शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करून ठेवलेली आहे.  जोपर्यंत या संकुलांच्या बांधकामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे ,परंतु मध्यंतरीच्या काळात महिलांसाठी फिरते स्वच्छतागृह सुरू करण्याचा प्रयत्न केला होता आणि आजही तो सुरू आहे. शौचालयाच्या सुविधेच्या वाहनाची बांधणी सुरू असून लवकरच ते फिरते वाहन महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button