Jalna District

कुंडलिका नदी पात्रात वाहत आला मृतदेह

जालना-  शहरातून वाहत असलेल्या कुंडलिका नदीच्या पात्रात आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एक मृतदेह वाहत आला.

शहराच्या मध्य भागातून वाहत असलेल्या या नदीच्या पात्रावर तीन पूल आहेत. लक्कडकोट येथील पुलाखालून हा मृतदेह निघाल्यानंतर उरलेल्या दोन्ही पुलांवर बघ्यांची गर्दी झाली, आणि अवघ्या काही वेळातच हा मृतदेह वाहत येत असताना दिसला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे नवीन पुलाच्या खालून हा मृतदेह पुन्हा एका लहान या पुलाच्या खालून पुढे सरकला.

दरम्यान काही होतकरू तरुणांनी नदीच्या पात्रात धाव घेऊन हा मृतदेह अडविण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांना यशही आले. एका तरुणाच्या मदतीला दुसरा तरुण धावल्याने हा मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आला. दरम्यान सुमारे 40 ते 45 वर्ष वय असलेला हा मृतदेह आहे. अंगावर फक्त  अंडरवेअर आहे , तसेच शरिरावर इतर काही जखमा नाहीत , मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळीच वाहात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

*दिलीप पोहनेरकर*edtv news,९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button