भाजपच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसचा महाराष्ट्र बंद ;आ.गोरंट्याल यांची माहिती
जालना -उत्तर प्रदेश मधे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते आणि या आंदोलनामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून सात शेतकऱ्यांचा आणि एका पत्रकाराचा जीव घेतला आहे.
तेथील भाजप सरकार मात्र या पिता पुत्रावर काहीच कारवाई करत नाही त्यामुळे या भाजप सरकारच्या सरकार निषेधार्थ सोमवार दिनांक 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये ्यापार्यांनी मदत करावी असे आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज केले .
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोरंट्याल यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमुद, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती विमाल आगलावे, यांची उपस्थिती होती.
दरम्यान पुढे बोलताना आमदार गोरंट्याल म्हणाले की महाराष्ट्र मध्ये आघाडी सरकार मधील कोणताही मंत्री भाजप सरकारच्या विरोधात बोलला की लगेच त्याच्या मागे ईडी ची कारवाई सुरू होते, धाड पडते ,मात्र भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश मधील सरकार च्या मंत्र्यांनी आणि त्याच्या परिवाराने काहीही केले तरी त्याची चौकशी होत नाही. दरम्यान आशिष मिश्रा हे नेपाळला पळून गेले असल्याची ही माहिती आहे, असे असतानाही केंद्र सरकार यावर कुठलीच कारवाई करीत नाही. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवार दिनांक 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदमध्ये मित्र पक्षही सामील होणार आहेत व्यापार्यांनी देखील आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मदत करावी असे आवाहन काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,९४२२२१९१७२