बाल विवाहांचे प्रमाण कमी झाले पाहिजे -सभापती सौ. आयोध्या चव्हाण
जालना- आधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे . हे प्रमाण जालना जिल्ह्यात 13 टक्के आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी संकल्प करायला हवा ही माझ्या मुलीचा बालविवाह करणार नाही आणि असे झाले तरच खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा केल्यासारखे होईल असे मत जालना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या सभापती सौ. आयोध्या जयप्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केले.
ईडी टीव्ही न्युज जालना साठी नवरात्रोत्सवाची तिसरी रणरागिणी म्हणून त्या विशेष मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या . बदनापुर शिवसेनेचे तत्कालीन आमदार स्वर्गीय नारायणराव चव्हाण यांच्या स्नुषा आहेत .त्यामुळे घराला राजकीय वारसा आहे . जालना तालुक्यातील गाढे सावरगाव येथील खोतकर घराण्यातून विवाहानंतर त्यात चव्हाण परिवारात आल्या.
गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्यामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद घेता आला नाही मात्र आता मंदिरे उघडल्याने ती कसर भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले .याच दरम्यान घर, नातेवाईक ,सभापती पदाची जबाबदारी हे सर्व सांभाळत असताना समन्वयाची सांगड घातल्या जातेच ,मात्र कधी काळी जर ताण पडला तर तो तान हलका करण्यासाठी देवाचे नामस्मरण करून नष्ट केला जातो असेही त्यांनी सांगितले .
महिला व बाल कल्याण सभापती ची जबाबदारी संभाळत असताना त्यांनी आत्तापर्यंत सन 2019 -20 मध्ये जिल्हा नियोजन विकास समितीच्या मार्फत पाच कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. आणि त्यामधून 48 अंगणवाडीच्या इमारती बांधल्या आहेत तर 283 अंगणवाड्यांची दुरुस्ती केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शासन निर्णयानुसार 135 बालकांना दर महिन्याला प्रत्येकी अकराशे रुपये आणि अठरा वर्षांपर्यंत बालसंगोपनाचा खर्च देण्यात येणार आहे.
समाजातील सर्वात मोठा प्रश्न बालविवाहाचा आहे आणि त्या संदर्भात नुकतीच सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस जालना जिल्हा परिषदेमध्ये या विषयावर विशेष परिषदही झाली आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जाऊन यंत्रणा राबवून याविषयी जनजागृती करण्याचे ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले
दिलीप पोहनेरकर ,edtv news,९४२२२१९१७२