Jalna District

25 बालकांवर होणार हृदयविकाराची मोफत शस्त्रक्रिया

जालना- आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत जालना येथे जिल्हा अतिशीघ्र हस्तांतरण केंद्र( डी.ई. आय. सी.) च्या वतीने 0 ते 18 वयोगटातील बालकांवर विविध उपचार मोफत केले जातात. त्यामधील हृदय विकार या आजारावर देखील इथे मोफत उपचार केले जातात, आणि त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार दिनांक 8 रोजी 78 बालकांची तपासणी करण्यात आली.  त्यापैकी 25 बालकांवर हृदयविकाराची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे येथील बाल रोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात काल टू डी इको चे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन  डॉ.सुगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, बाल रोग तज्ञ डॉ.संजय जगताप, डॉ. अर्चना खंडागळे आणि या प्रकल्पाच्या व्यवस्थापिका डॉ. मीनल देवळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

या विशेष शिबिर विषयी माहिती देताना डॉ. सुगावकर म्हणाले की ,अशा प्रकारचे आजार हे जन्मजात देखील असू शकतात आणि पुढील एक ते दोन महिन्यांमध्येच या आजाराचं निदान होणे गरजेच आहे. आजच्या या शिबिरामध्ये हृदयाचे विकार असलेल्या 78 बालकांची तपासणी करण्यात आली आहे, आणि त्यापैकी पंचवीस बालकांवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यानुसार या शस्त्रक्रिया कुठे करता येतील याचे नियोजन केल्या जाणार आहे.  या सर्व शस्त्रक्रिया मोफत असणार आहेत. यापूर्वी देखील अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते, आणि या शिबिरामध्ये झालेल्या शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी झाल्या आहेत .या आजाराविषयी ची लक्षणे देखील डॉ.सुगावकर यांनी सविस्तर सांगितली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी.ई. आय.सी. च्या पर्यवेक्षिका श्रीमती विद्या मस्के ,डॉ अमित जयस्वाल, वर्षा निर्मल, गजानन खरात, राजू खिलारे, आदींनी परिश्रम घेतले.

दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button