सोमवारच्या बंद ची तयारी ;तिनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची बैठक
जालना- आपल्या विविध मागण्यांसाठी उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी आंदोलन करत असताना भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकर्यांच्या अंगावर वाहन घालून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला .यामध्ये सात शेतकरी आणि एक पत्रकार ठार झाला आहेत. असे असतानाही या पिता पुत्रांवर काहीच कार्यवाही होत नाही आणि आरोपी देखील नेपाळला पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे ,या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सत्तेत असलेल्या तीनही आघाडीच्या पक्षाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
्या पार्श्वभूमीवर आज जालन्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांच्या निवासस्थानी या तिन्ही पक्षांच्या जिल्हाप्रमुख यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर ,आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख डॉक्टर निसार देशमुख ,यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात ,माजी आमदार अरविंदराव चव्हाण, बाळासाहेब वाकुळणीकर काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद आदींची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172