Jalna District

…. अन्यथा 13 पासून काम बंद आंदोलन; तलाठ्यांचा ईशारा

जालना-तलाठ्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, यांचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांना या पदावरून त्वरित हटवावे अन्यथा दिनांक 12 रोजी तहसीलदारांकडे सर्व दप्तर जमा करू आणि 13 तारखेपासून बेमुदत आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिला आहे.

आज जालना तहसील समोर आंदोलन करून तहसीलदारांना यासंदर्भात निवेदनही दिले आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण कळकुंबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, आणि एकूणच महसूल प्रशासन गतिमान आणि पारदर्शक  काम करत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून जनतेपर्यंत हे काम पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी, मंडळ ,अधिकारी महासंघाचे अध्यक्ष डुबल आप्पा यांनी सध्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी यांच्या ग्रुप वर एक मेसेज टाकला होता. या मेसेजला या संघाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी ग्रुप वर “मूर्खासारखे मेसेज पाठवू नका” असे म्हणून डुबल आप्पा यांना मूर्ख ठरवले आहे. पर्यायाने अशा संदेशामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांना देखील मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे रामदास जगताप यांना या पदावरून त्वरित हटवावे अन्यथा दिनांक 12 रोजी जिल्ह्यातील तलाठी आपले दप्तर तहसील कार्यालयात जमा करतील आणि 13 तारखेपासून शासनाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकतील असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172

Related Articles