शिक्षणामुळे सर्व समस्यांवर मात करता येते- डॉ. पल्लवी अंभोरे

जालना -सर्व समस्यांवर मात करता येण्यासाठी शिक्षण घेणे हा एकमेव पर्याय आहे. समाजात राहणीमानामुळे ज्या मुलींवर अन्याय अत्याचार होतो हे प्रमाण अगदीच नगण्य आहे, ज्या मुलींना पुढे जायचं आहे ते या अशा राहणीमानाला बळी न पडता उच्च शिक्षण घेऊन पुढे जातात ,असे मत बदनापूर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी व्यक्त केले.ई डी. न्युज वर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या “रणरागिनी” या मालिकेत दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.
लोकप्रशासन या विषयात त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मनुष्यबळ( एच. आर.) मध्ये पीएचडी ही पदवी मिळाल्यामुळे त्यांच्या नावापुढे “डॉक्टर” ही पदवी लागली. घर उच्चशिक्षित असल्यामुळे वडिलांच्या नोकरीनिमित्त दर तीन वर्षांनी गाव बदलत त्यांचं बालपण गेलं, त्यामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद फारसा लुटता आला नाही. परंतु घरात असलेल्या उच्चशिक्षित वातावरणामुळे आजोबा उपजिल्हाधिकारी, वडील एका बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक, अशा वातावरणात त्या वाढल्यामुळे .सहाजिकच त्यांच्या मागे असलेले नोकर-चाकर आणि त्यांचा बडेजाव यामुळे त्यांना या क्षेत्राचं आकर्षण होतं, प्रशासकीय क्षेत्र त्यांना खुणावत होतं, आणि त्यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार “जर समाज सेवा करायची असेल तर शासकीय नौकरी हा एक चांगला पर्याय आहे” असेही त्या म्हणाल्या आणि म्हणूनच त्यांना नोकरीचं आकर्षण वाटत होतं.
त्यांनी 2015 मध्ये नगरपंचायत चा मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. दर तीन वर्षांनी गाव बदलत राहावे लागत असल्यामुळे नवनवीन ठिकाणचे वातावरण पाहायला मिळालं ,मात्र नवरात्रोत्सवाचा आनंद लुटता आला नाही. परंतु ज्यावेळी मुंबई मध्ये होत्या त्यावेळी मुंबईकरांचा आनंदाचा उत्साह, तो जल्लोष, आणि आनंदाला येणारी भरती त्यांनी अनुभवलेली आहे. जीव एकवटून मुंबईकर हा आनंद साजरा करतात. तो एक अविस्मरणीय क्षण असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान समाजामध्ये गरीब कुटुंबातील मुलींना पुढे यायचा असेल तर शिक्षण हे एकमेव पर्याय आहे.
मुलींमध्ये समजूतदारपणा जास्त असतो आणि केवळ त्याच कारणामुळे आता सर्वच क्षेत्रात मुलींनी पाय रोवले आहेत, आणि आघाडीवर देखील आहेत. आघाडीवर जाताना समस्या तर येणारच मात्र त्यावर मात करायची असेल तर शिक्षणानेच ती मात करता येऊ शकते याचा पुनरुच्चारही डॉ. पल्लवी अंभोरे यांनी केला.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172