Jalna District

जीजीमाय भजनी मंडळाचे विसावे वर्ष: रंगला भजनाचा कार्यक्रम

जालना- शहरातील देहेडकरवाडी भागात असलेल्या जीजीमाय महिला भजनी मंडळाचा हे विसावे वर्ष आहे. सन 2000 मध्ये पंचपदी च्या माध्यमातून सुरु झालेल्या या भजनी मंडळाचा उपक्रम वाढतच गेला आणि आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने या महिला मंडळाच्या भजनामध्ये चांगलाच रंग भरत आहे.

परमपूज्य प्रल्हाद महाराज यांच्या प्रेरणेने हे भजनी मंडळ तयार झाले आहे .सुरुवातीला पाच महिलांमध्ये सुरू झालेले हे भजनी मंडळ आज 50 महिलांपर्यंत पोहोचले आहे .कालपरत्वे भजनाच्या चालीरीती ही बदलल्या आहेत मात्र भजनी मंडळातील सदस्यांची देवी-देवता वरची श्रद्धा आजही पूर्वीप्रमाणेच दृढ आहे .या भजनी मंडळात संपदा कुलकर्णी, मनीषा शिपोरकर, सुलभा शिपोरकर, देेहेडकर परिवारातील,माधुरी, रेखा,रसना,नीता,लता या महिला तसेच छाया पाटील, सारिका लताड ,सुजाता डोणगावकर, आदी महिलांचाही समावेश आहे.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button